नविन लेख

Literature | आपण लिहा, आम्ही प्रसिध्द करू; साहित्यिकांना आवाहन

सर्व साहित्यिकांना द ब्लॅक पँथरच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येते की, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. लोकं भेटत असतात. आपण विविध विषयांवर विचारमंथन करता. हे मंथन साहित्य रूपाने आपण लिहीत असता. कविता, कथा, व्यंगचित्र, चित्र अशा स्वरूपात आपण ते लिहून ठेवता. पण त्यास योग्य प्रसिद्धी मिळाली तर आपल्या विचाराचे लोकमंथन होऊन समाज पुढे घेऊन जाण्यास मदत होईल.

आपण व्हॉईसलेस समाजाचा व्हॉईस होऊ शकता. ज्यांच्यासाठी कोणीच नाही त्यांच्यासाठी द ब्लॅक पँथर आहे. मुक समाजाचा मुकनायक होण्याची संधी द ब्लॅक पँथर आपणास देत आहे.

तर चला…कथा, कविता, चित्र, व्यंगचित्र आदी साहित्य 9405401800 या व्हॉटसअप क्रमांकावर नाव, गाव आदींसह पाठवा.

एक नम्र विनंती, आपण जे साहित्य पाठवला ते आपलेच असावे. दुसऱ्याने लिहलेले नसावे, कोणाची कॉपी नसावी. लेखकाच्या बौध्दिक संपदेचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, त्याचा मान ठेवला पाहिजे.Literature

ही ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘ईसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

2 thoughts on “Literature | आपण लिहा, आम्ही प्रसिध्द करू; साहित्यिकांना आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× आपल्याला काही मदत पाहिजे का ?