
(Fake news) आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रसार झपाट्याने होत असतो. सोशल मीडियापासून ते न्यूज चॅनल्सपर्यंत, प्रत्येकजण बातम्या पसरवण्याच्या स्पर्धेत आहे. मात्र, या स्पर्धेत अनेकदा खोट्या बातम्या (फेक न्यूज) पसरवल्या जातात, ज्याचा थेट परिणाम समाजावर, विशेषतः युवकांवर होतो. अर्नब गोस्वामी यांच्या R. Bharat या चॅनलने अनेकदा खोट्या बातम्या प्रसारित केल्याचा इतिहास आहे. उदाहरणार्थ, वर दाखवलेल्या फोटोत ‘भारत-पाकिस्तान युद्ध सुरू? Live देख रहीं है दुनिया!’ असा खळबळजनक मथळा दाखविला आहे, जो खोटा किंवा अतिशयोक्तीपूर्ण असण्याची शक्यता आहे.
(Fake news) अशा फेक न्यूजमुळे युवकांमध्ये भीती, गैरसमज आणि आक्रमकता वाढण्याचा धोका स्पष्ट दिसत आहे. फेक न्यूजचा देशातील तरूणांवर, युवकांवर होणारा परिणाम आपण समजून घेतला पाहिजे. फेक व खोट्या बातम्यांमुळे युवकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होते. भारत-पाकिस्तान युद्धासारख्या संवेदनशील विषयांवर खोटी माहिती पसरवल्याने तरुणांमध्ये तणाव आणि असुरक्षितता वाढते. चुकीच्या बातम्यांमुळे युवक आक्रमक बनू शकतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या माहितीमुळे सामाजिक तेढ वाढते, ज्यामुळे हिंसक घटना घडू शकतात. सतत खोट्या बातम्या पाहिल्याने युवकांचा मुख्य प्रवाहातील माध्यमांवरचा विश्वास कमी होतो. यामुळे ते चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू लागतात.
(Fake news) फेक न्यूजचा वापर अनेकदा रा.स्व.संघ आणि बीजेपीच्या साडेचाळीस पैसे रेटवाल्या आयटी सेलकडून राजकीय हेतूसाठी केला जातो. यामुळे युवकांमध्ये मतभेद वाढतात आणि समाजात फूट पडते. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या भारतीय युवकांची जबाबदारी वाढलेली आहे. हाच युवक आपल्या देशाचा कणा आहे. कणा कणखर असेल तर शरीर धडधाकट असते, त्यामुळे फेक न्यूजच्या समस्येवर मात करण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
(Fake news) आपल्या युवकांनी जबाबदारीने वागल्यास देश, समाज सुरक्षित राहिल. त्यासाठी आपल्या फोनवर आलेली कोणतीही बातमी शेअर करण्यापूर्वी तिची खात्री करून घेणे गरजेचे आहे. विश्वसनीय स्रोत, सरकारी वेबसाइट्स किंवा पडताळणी साइट्स (जसे की Alt News) वापरून माहिती तपासावी. आपल्या कुटुंबात आणि मित्रमंडळींमध्ये फेक न्यूजबद्दल जागरूकता निर्माण करावी तसेच खोट्या बातम्यांचे दुष्परिणाम समजावून सांगावे. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी प्लॅटफॉर्मवर बातम्या शेअर करताना सावधगिरी बाळगावी. अनव्हेरिफाइड माहिती पसरवू नये, पुढे पाठवू नये. न्यूज चॅनल्स किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीचे विश्लेषण कसे करावे, हे शिकावे. खोट्या बातम्या ओळखण्यासाठी खास प्रशिक्षण घ्यावे, त्याचे ठोकताळे समजून घ्यावे. जर एखाद्या न्यूज चॅनलने खोटी बातमी पसरवली, तर त्याची तक्रार करावी आणि इतर कोणी केलेल्या कायदेशीर कारवाईला पाठिंबा द्यावा.
अर्नब गोस्वामीसारख्यांच्या फेक न्यूज ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे, आणि R. Bharat सारख्या चॅनल्सने अनेकदा खोट्या बातम्या देऊन समाजात गोंधळ निर्माण केला आहे. अशा परिस्थितीत भारतीय युवकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. माहितीची पडताळणी करणे, जागरूकता पसरवणे आणि माध्यम साक्षरता वाढवणे यामुळे फेक न्यूजचा प्रभाव कमी होऊ शकतो. युवकांनी सत्याचा मार्ग निवडून समाजाला योग्य दिशा दाखवावी, हीच खरी जबाबदारी आहे. त्यासाठी रयत समाचारसारखे जबाबदार न्यूज पोर्टल पहावे.
एकदम बरोबर आहे खोट्या बातम्या वर विश्वास ठेऊ नये
आभार, सर